समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

Webdunia
रविवार, 12 मार्च 2023 (11:11 IST)
समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. समृद्धी महामार्गावर वेगवान  कार  उलटून  झालेल्या अपघातात सहा जणांचा  मृत्यू झाला  आहे. औरंगाबादवरुन कार शेगावला जात होती. मेहकर जवळ सिवनी पिसा गावाच्या नजीक नागपूर कॉरिडॉर येथे हा अपघात होऊन त्यात 3 महिला आणि 2 मुलांचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले. घटनास्थळी पोलीस दाखल  झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून  वाहनात एकूण 9 प्रवासी होते. अपघातामुळे बऱ्याच काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केले.    
 
Edited By - Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

पुढील लेख