हसन मुश्रीफ यांचा अडचणीत वाढ , सोमवारी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स

Webdunia
रविवार, 12 मार्च 2023 (10:45 IST)
हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी शनिवारी पहाटे ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. दीड महिन्यांत तिसऱ्यांदा मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी तब्बल साडेनऊ तास ईडीचं पथक मुश्रीफांच्या घराची झाडाझडती घेत होतं.
 
ईडीने हसन मुश्रीफ यांना चौकशीसाठी समन्स बजावले असून येत्या सोमवारी म्हणजेच 13 मार्चला ईडी कार्यालयात त्यांना उपस्थित राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. 'कागल येथील मुश्रीफांच्या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी करत तपास सुरू केला गेल्या दोन महिन्यात हसन मुश्रीफ यांच्यावर तिसऱ्यांदा ईडीची कारवाई करण्यात आल्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार याची शक्यता निर्माण झाली आहे. दीड महिन्यांत तिसऱ्यांदा मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्यात आली. येत्या सोमवारी म्हणजेच 13 मार्चला ईडी कार्यालयात त्यांना उपस्थित राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत
 
Edited By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

पुढील लेख