श्रीकृष्ण आणि पुतना वधाची गोष्ट

शुक्रवार, 23 ऑगस्ट 2024 (13:29 IST)
राक्षसराजा कंस बाळकृष्णाला ठार मारण्यासाठी सैदव आतुर असायचा. याकरिता एकदा कंसाने भयानक राक्षसी पूतना हिला बोलावले. ही राक्षसी खूप भयंकर आणि अक्राळविक्राळ होती. कंसाने तिला एक सुंदर, तरुण मुलीचे धारण करण्यास सांगितले.  तसेच आदेश दिला की जे देखील गोकुळात नंदाच्या लहान बाळ जन्माला आले आहे आणि ते बाळ माझ्या मृत्यूचे कारण बनणार आहे तर याआधीच तू त्याच्या वाढ कर. याकरिता पूतना राक्षसी हो म्हणाली व सुंदर मुलीचे रूप धारण करून ती निघाली.
 
पूतना श्रीकृष्ण असलेले गाव गोकुळात आली. जेव्हा तिने ऐकले की, सर्वजण यशोदाच्या नवजात बाळाबद्दल बोलत आहे. तेव्हा ती रूप बदलून नंदराजाच्या घरी गेली व म्हणाली की, तुमच्या घरी लहान बाळ जन्माला आले आहे. माझे दूध अमृतासमान आहे. माझे दूध जर लहान बाळ प्यायले तर ते सदैव सुरक्षित राहील. हे ऐकून मैय्या यशोदा तिच्या बोलण्याला भाळते व छोट्याश्या बाळकृष्णाला दूध पिण्यासाठी तिच्याजवळ देते. पण राक्षसीला ठाऊक नसते की, ती ज्या बाळाचा वध करायला आली आहे ते बाळ साक्षात भगवान विष्णूंचा अवतार आहे. पूतना बाळकृष्णाला आपले विषारी दूध पाजण्यासाठी जवळ घेते. पण उलट तिला यातना व्हायला लागतात. ती राक्षसी ओरडायला लागते, व आपल्या मूळरूपात येते. तिला पाहून सर्वजण घाबरतात. यशोदा मैया खूप घाबरते कारण राक्षसीच्या हातात लहान बाळकृष्ण असतात. कसे बसे ती बाळकृष्णापासून स्वतःला सोडवते व खाली कोसळून मरण पावते. अश्याप्रकारे बाळकृष्णाच्या हातून पूतना या भयंकर राक्षसीचा वाढ होतो आणि तिला मोक्ष मिळतो. 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती