पंचतंत्र कहाणी : दोन सापांची कथा

शनिवार, 17 ऑगस्ट 2024 (12:56 IST)
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका नगरमध्ये देवशक्ति नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या मुलाच्या पोटात सापाने आपले घर बनवले होते. पोटात साप गेल्याने राजकुमार आता अशक्त व्हायला लागला होता. हे पाहून राजाने अनेक प्रसिद्ध वैद्यांकडून त्याच्यावर उपचार केले.पण राजकुमाराची प्रकृती सुधारत न्हवती. राजकुमारच्या प्रकृतीला घेऊन राजा नेहमी चिंतीत असायचा. एक दिवस राजकुमार आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात गेला व एका मंदिरात भीक मागू लागला. 
 
राजकुमार ज्या राज्यामध्ये गेला होता. तिथे बळी नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला दोन तरुण मुली होत्या. दोन्ही रोज सकाळी आपल्या वडिलांच्या आशीर्वाद घ्यायचा. एका सकाळी दोन्हींपैकी एक मुलगी राजाला प्रणाम करतांना म्हणाली, “महाराजांचा विजय असो, तुमच्या कृपेमुळे सर्व सुखी आहे.” तर दुसरी मुलगी म्हणाली, “महाराजा, ईश्‍वर तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देवो. हे ऐकून राजाला भयंकर राग आला. क्रोधीत झालेल्या राजाने मंत्रींना आदेश दिला की, “कठोर शब्द बोलणाऱ्या या मुलीचा विवाह गरीब मुलाशी करण्यात यावा, म्हणजे ती कर्माचे फळ स्वतः भोगेल .
 
राजाने दिलेला आदेश पाळत मंत्रींनीं या मुलीचे लग्न मंदिरात बसलेल्या भिकारीसोबत लावले. तो भिकारी राजकुमार होता. राजकुमारी त्याला आपला पती मानून सेवा करू लागली. काही दिवसानंतर दोघेजण मंदिर सोडून दुसऱ्या प्रदेशात निघून जातात.
 
प्रवास करतांना राजकुमाराला थकवा येतो. तो एका झाडाखाली विश्राम करतो. राजकुमारी जवळील गावामध्ये जेवण आणि पाणी आणण्यासाठी निघून जाते. ती येते तेव्हा तिला दिसते की राजकुमाराच्या तोंडातून साप बाहेर येतांना दिसतो. सोबतच जवळील एका बिळामधून साप बाहेर पडतांना दिसतो. दोन्ही साप बोलू लागतात व ते संभाषण राजकुमारी ऐकते.
 
एक साप म्हणतो की,“तू या राजकुमाराच्या पोटात राहून याला पीडा का देतो आहेस. सोबतच तू स्वतःच्या जीवनाला संकटात टाकत आहे. जर कोणी राजकुमाराला जिरे आणि मोहरीचे सूप पाजले तर तुझा मृत्यू होईल. मग राजकुमाराच्या तोंडातून निघालेला साप म्हणतो की, “तू या बिळात ठेवलेल्या सोन्याच्या घडयांची रक्षा का करीत आहे. जे तुझ्या कोणत्याही कामाचे नाही. जर कोणाला या सोन्याच्या घड्याबद्दल समजले तर ते या बिळात गरमपाणी किंवा तेल टाकतील, ज्यामुळे तुला मरण येईल.
 
या संभाषणानंतर दोन्ही साप आपल्या आपल्या ठिकाणी परत निघून जातात. पण राजकुमाला दोन्ही सापांचे रहस्य माहित झाले होते. याकरिता, राजकुमारी पहिले राजकुमारला जेवणासोबत जिरे आणि मोहरीचे सूप पाजते. काही वेळानंतर राजकुमाराला चांगले वाटते आणि प्रकृतीमध्ये सुधारणा होते. मग राजकुमारी बिळामध्ये गरम पाणी आणि तेल टाकून देते. ज्यामुळे सापांचा मृत्यू होऊन जातो. यानंतर सोन्याने भरलेला घडा घेऊन राजकुमार आणि राजकुमारी आपल्या प्रदेशात परत जातात. राजा देवशक्ति आपल्या मुलाचे आणि सुनेचे धुमधडाक्यात स्वागत करतो.
 
तात्पर्य: या कथेतून असे शिकायला मिळते की, जर कोणी कोणाबद्दल वाईट विचार करत असेल तर त्याचे आधी वाईट होते. सापाने जेव्हा राजकुमाराचे वाईट चिंतले तेव्हा त्याचेच आधी वाईट झाले 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती