पंचतंत्र कहाणी : प्रामाणिक पोपटाची कथा

सोमवार, 21 ऑक्टोबर 2024 (06:09 IST)
अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका घनदाट जंगलामध्ये एक विशालकाय वडाचे झाड होते. त्या झाडावर खूप पोपट राहत होते. ते नेहमी इकडच्या तिकडच्या गोष्टी करायचे. त्या सर्वांमध्ये मिट्ठू नावाचा एक पोपट राहत होता. तो खूप कमी बोलायचा. तसेच त्याला शांतता आवडायची. सर्व त्याच्या या सवयीची खिल्ली उडवायचे, पण तो कधीही कोणाच्या गोष्टीचे वाईट वाटून घ्यायचा नाही. 
 
एकदा दोन पोपट आपआपसात गोष्टी करीत होते. पहिला पोपट म्हणाला,“मला एकदा खूप गोड आंबा सापडला. मी आला खूप आवडीने खाल्ले. यावर दुसऱ्या पोपटाने उत्तर दिले. “मला देखील एकदा फळ मिळाले होते, मी देखील ते खूप आवडीने खाल्ले होते. तसेच मिट्ठू पोपट शांत बसून सगळे बोलणे ऐकत होता. तेव्हा पोपटाच्या मुखियाने त्याला विचारले. अरे आपले पोपटांचे कामच आहे बोलणे. तू का शांत बसतोस?, तू खरा पोपट वाटतच नाही. तू नकली पोपट आहेस” यानंतर त्याला सर्व जण नकली पोपट नकली पोपट म्हणून चिडवायला लागले. पण मिट्ठू पोपट तरी देखील शांत बसलेला होता. 
 
हे असेच चालत राहिले. मग एकदा रात्री मुखियाच्या पत्नीचा दागिना चोरीला गेला. ती रडत आली आणि तिने सर्व गोष्ट सांगितली. व म्हणाली की “कोणीतरी माझा हार चोरी केला आहे. तो आपल्या झुंड मधील एक आहे.” हे ऐकून मुखियाने लवकर सभा बोलावली. सर्व पोपट सभेसाठी एकत्रित जमा झाले. मुखिया म्हणाला की, “माझ्या बायकोचा हार चोरीला गेला आहे कोणी चोराला पळतांना पहिले का?”
 
तो चोर आपल्यातील एक आहे हे ऐकून सर्वांना धक्का बसला. नंतर मुखिया परत म्हणाले की त्या चोराने आपले तोंड पडद्याने झाकून ठेवले होते, पण याची चोच दिसत होती. त्याची चोच लाल रंगाची होती. आता पूर्ण कळपाची नजर मिट्ठू पोपटावर गेली. तसेच हीरू नावाच्या दुसऱ्या पोपटावर देखील गेली, कारण कळपामध्ये केवळ या दोघांचीच चोच लाल होती. आता मुखिया ने याचा पत्ता लावण्यासाठी एका कावळ्याची मदत घेतली.
 
असली चोराचा पत्ता लावण्यासाठी कावळ्याला बोलावण्यात आले. कावळ्याने लाल चोच असलेले हीरू आणि मिट्ठू पोपटाला समोर बोलावले. कावळ्याने विचारले तुम्ही दोघे चोरी झाली तेव्हा कुठे होतात. यावर हीरू तोता म्हणाला के मी त्या दिवशी खूप थकलो होतो. मी जेवण करून लवकर झोपायला निघून गेलो. तर मिट्ठू पोपटाने हळू आवाजात सांगितले की मी त्या रात्री झोपलो होतो.  
 
हे कुणी कावळ्याने परत विचारले “तुम्ही दोघे आपले उत्तर सिद्ध करण्यासाठी काय करू शकतात.” यावर हीरू पोपट मोठ्या आवाजात म्हणाला “मी त्या रात्री झोपलेला होतो. माझ्या बद्दल सर्वांना माहित आहे. ही चोरी मिट्ठू ने केली असले. याकरिता तो एवढा शांत उभा आहे.” मिट्ठू पोपट शांत उभा होता. सभेमध्ये उपस्थित सर्व पोपट शांतपणे पाहत होते. मिट्ठू पोपट परत हळू आवाजात म्हणाला की, मी चोरी केलेली नाही. 
 
हे ऐकून कावळा हसत बोलला की,चोराचा पत्ता लागला आहे. सर्वांना हे ऐकून आश्चर्य वाटले. कावळ्याने सांगितले की चोरी हीरू पोपटाने केली आहे. यावर मुखिया म्हणाला की, “तुम्ही हे कसे सांगू शकतात?” कावळा हसत म्हणाला की, “हीरू पोपट जोऱ्याने बोलून आपले खोटे सिद्ध करत होता, जेव्हा की, मिट्ठू पोपटला  माहित होते की तो खरे बोलत आहे. याकरिता तो आपली गोष्ट आरामात सांगत होता.” कावळा पुढे म्हणाला की, “तसे देखील हीरू पोपट खूप बोलतो, त्याच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. यानंतर हीरू पोपटाने आपला गुन्हा कबुल केला व सर्वांची माफी मागितली.
 
हे ऐकून सर्व पोपट हिरू पोपटाला कठोर शिक्षा देण्याविषयी बोलू लागले, पण मिठू पोपट म्हणाला की “मुखियाजी, हिरू पोपटाने आपली चूक मान्य केली आहे. त्याने सर्वांसमोर माफी देखील मागितली आहे. ही चूक त्याने पहिल्यांदाच केली आहे, त्यामुळे त्याला माफ केले जाऊ शकते.” हे ऐकून मुख्याने हिरू पोपटाला माफ केले.
 
तात्पर्य- कधी कधी जास्त बोलून आपण आपले महत्त्व गमावून बसतो. त्यामुळे गरज असेल तेव्हाच बोलावे.

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती