पंचतंत्र : दोन तोंड असलेला पक्षी

गुरूवार, 17 ऑक्टोबर 2024 (20:30 IST)
एका तलावाजवळ एक भारण्ड नावाचा एक विचित्र पक्षी राहायचा. ज्याला दोन तोंड होते. परंतु एक पोट होते. एकदा फिरतांना त्याला किनाऱ्यावर एक अमृतसमान गोड फळ मिळाले. ते फळ त्या पक्षाने उचलले आणि एक तोंड म्हणाले वाह हे फळ किती गोड आहे. आज पर्यंत मी अनेक फळे खाल्ली पण यासारखा स्वाद कधीही पाहिला नाही. 
 
तसेच दुसरे तोंड यापासून वंचित राहिले. तसेच ते पहिल्याला तोंडाला म्हणाले मला देखील याची चव चाखायला दे. पहिले तोंड म्हणाले तुला काय करायचे पोट तर एक आहे ना आपल्या पोटातच तर गेले. उरलेले फळ त्याने आपल्या प्रियसीला दिले. ते फळ खाऊन प्रियसी प्रसन्न झाली. त्यादिवसापासून दुसऱ्या तोंडाला भयंकर राग आला व बदला घेण्यासाठी तो विचार करू लागला. 
 
एक दिवस दुसऱ्या तोंडाला एक उपाय सुचला. त्याला एक विषारी फळ दिसले. पहिल्या तोंडाला दाखवत तो म्हणाला की, बघ मला हे विष फळ दिसले आहे आणि मी ते खाणार आहे. तसेच पहिले तोंड त्याला म्हणाले की, अरे असे करू नकोस तू हे खाल्लेस तर आपण दोघे ठार होऊ. पण दुसऱ्या तोंडाने त्याचे काहीही ऐकले नाही व ते  विष फळ काहून टाकले. परिणाम हा झाला की, दोन तोंड असलेला पक्षी शेवटी मरण पावला. 
 
तात्पर्य : नेहमी स्वतःसोबत दुसऱ्याचा देखील विचार करावा.  

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती