त्या गुफेचा मालक एक कोल्हा होता. तो दिवसभर फिरून आपल्या गुहेमध्ये परत आला. गुहेमध्ये गेल्यावर त्याने आत मध्ये गेलेल्या सिंहाच्या पायाचे ठसे पहिले होते. व तो स्वतःला म्हणाला की, गुहेमध्ये तर सिंह गेलेला दिसत आहे. पण आतून बाहेर आलेला नाही. त्याला समजले की, नक्कीच त्या गुहेमध्ये सिंह लपून बसला आहे. कोल्हा तसा हुशार होता. त्याने एक युक्ती केली, तो गुहेच्या मध्ये गेला नाही तर त्याने बाहेरूनच आवाज दिला, ए माझी गुन्हा तू गप्प का आहेस? आज बोलत का नाहीस? जेव्हा पण मी बाहेरून येतो,तू मला बोलावतेस आज बोलत का नाही आहेस?
गुहेमध्ये बसलेला सिंह विचार करू लागला की, हे खरे आहे? प्रत्येक दिवशी गुहा कोल्ह्याला आवाज देऊन बोलावते. आज माझ्या भीतीमुळे गप्प आहे. आज मी याला आवाज देऊन आतमध्ये बोलावतो. मग सिंहाने मोठी गर्जना केली व कोल्ह्याला म्हणाला की, ये मित्र आतमध्ये ये. हा आवज ऐकून कोल्ह्याला समजले की, आतमध्ये सिंह बसला आहे. कोल्हा लागलीच तिथून पळाला. व मोठ्या युक्तीने कोल्ह्याने आपले प्राण वाचवले.