नीलकेतू आणि तेनालीरामची गोष्ट

मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 (20:30 IST)
एकदा राजदरबारामध्ये नीलकेतु नावाचा एक प्रवाशी राजा कृष्णदेवराय यांना भेटायला आला. राजाच्या सेवकांनी राजाला याची सूचना दिली. राजा ने नीलकेतूला भेटायची परवानगी दिली.
 
हा प्रवासी सडपातळ होता. तो राजा समोर आला आणि म्हणाला महाराज मी नीलदेशचा नीलकेतू आहे. व वेळी मी विश्वभ्रमण करिता निघालो आहे. सर्व जागेचे भ्रमण केल्यानंतर मी इथपर्यंत पोहचलो आहे. 
 
राजाने त्याचे स्वागत करीत शाही अतिथी म्हणून घोषित केले. राजा कडून मिळालेला मानसन्मान पाहून प्रवासी खुश झाला व म्हणाला की, महाराज मी त्या जागेला ओळखतो. जिथे खूप सुंदर परी राहतात. मी माझ्या जादूच्या शक्तीने त्यांना इथे बोलवू शकतो.
 
नीलकेतूचे बोलणे ऐकून राजा म्हणाला, याकरिता मला काय करावे लागेल. नीलकेतू ने राजाला रात्री तलावाजवळ येण्यास सांगितले. व नीलकेतू राजास म्हणाला की, त्या जागेवर मी पारींना नृत्य करण्यासाठी बोलवू शकतो. नीलकेतूचे म्हणणे ऐकून राजा रात्री घोड्यावर बसून निघाला. 
 
तलावाजवळ पोहचल्यानंतर जुन्या किल्ल्याजवळ नीलकेतूने राजाचे स्वागत केले. व म्हणाला महाराज मी सर्व व्यवस्था केली आहे परी आतमध्ये आहे. 
 
राजा नीलकेतू सोबत मध्ये जाऊ लागले. त्यावेळी राजाला आरडाओरडा ऐकू आला. राजाने पहिले तर सैन्याने नीलकेतूला बांधले होते.
 
हे पाहून राजा म्हणाला की, हे काय सुरु आहे. तेव्हा किल्ल्यातून तेनालीराम बाहेर येऊन म्हणाले की,  महाराज मी तुम्हाला सर्व सांगतो.
 
तेनालीराम ने राजाला सर्व सांगितले की, हा नीलकेतू एक रक्षा मंत्री आहे आणि महाराज किल्ल्यामध्ये काहीही नाही. हा नीलकेतू तुम्हाला जीवे मारणार होता. राजा ने तेनालीरामला आपला जीव वाचवला म्हणून धन्यवाद दिला. व राजा म्हणाले की, तेनालीराम हे तूला कसे काय समजले. 
 
तेनालीराम ने राजाला खरे सांगितले की, महाराज दरबारात जेव्हा नीलकेतु आला होता तेव्हाच मला संशय आला व मी समजून गेलो व नीलकेतूच्या मागावर सैन्य पाठवले. जेव्हा नीलकेतू तुम्हाला मारण्याची योजना बनवत होता. तेनालीरामच्या हुशारीमुळे राजाने तेनालीरामला धन्यवाद दिले.   

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती