Kids story : एकदा रात्री राजवाड्याच्या गच्चीवर बसून अकबर बादशहा व बिरबल गप्पा मारत होते. तेवढ्यात बादशहा बिरबलला म्हणाले, ''बिरबल, या आकाशात किती तारे असतील बरे?''
थोड्या वेळाने मोहर्या भरलेली परात आणून ती सेवकाने बिरबलाच्या पुढे ठेवली. मग तारे मोजण्याचे नाटक बंद करून ती परात बादशहापुढे ठेवीत तो म्हणाला, ''महाराज, जेवढ्या मोहर्या या परातीत आहे, बरोबर तेवढेच तारे या आकाशात आहे. नेमके तारे किती आहे, हे माहिती करून घ्यायचे असेल, तर या परातीतील एकेक मोहरी मोजीत, अशा सर्व परातभर मोहर्या मोजीत बसा, म्हणजे तुम्हाला तार्यांची संख्या समजेल. ''
यावर बादशहा म्हणाला, ''बिरबल, त्याची काहीच गरज नाही. केवळ या मोहर्या मोजीत मला माझे उरलेले आयुष्य खर्च करायचे नाही.'' व अकबराने बिरबलच्या हुशारीचे कौतुक केले.