Kids Story : गोकुळ निवासी देवराज इंद्रला खूप घाबरायचे. त्यांना वाटायचे की, देवराज इंद्र सृष्टीवर पाऊस पडतात. नगरीतील सर्व नागरिक इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी खूप पूजा करत असत. जेणेकरून भगवान इंद्राचा आशीर्वाद गोकुळावर राहील. तसेच एकदा श्रीकृष्णाने गोकुळातील लोकांना समजावून सांगितले की, भगवान इंद्राची पूजा करण्यात आपला वेळ वाया घालवण्याऐवजी गायी आणि म्हशींची पूजा करणे चांगले आहे. ते तुम्हाला दूध देतात. तसेच प्राण्यांना माया लावावी.
गोकुळवासी यांना श्रीकृष्णचे म्हणणे पटले व त्यांनी इंद्रदेवाच्या जागी प्राण्यांना मानसन्मान देण्यास सुरवात केली. इंद्रदेवाने बघितले की आता आपली कोणी पूजा करत नाही, तेव्हा या अपमानाने त्यांना धक्का बसला. तसेच इंद्रदेव संतापले आणि त्यांनी गोकुळातील लोकांना धडा शिकवण्याचे ठरवले. आता भगवान इंद्राने ढगांना गोकुळ नगरी बुडेपर्यंत पाऊस पाडण्याचा आदेश दिला. भगवान इंद्राची आज्ञा मिळाल्यानंतर गोकुळ नगरीवर जोरदार पाऊस पडू लागला.