एकदा चिमणी आपल्या अंड्यांसोबत झोपली होती.तसेच तिचा पती चिमणा हा अन्नाचा शोधात बाहेर गेला होता. तेव्हा तिथे एक रागिष्ट हत्ती आला व जवळपासच्या झाडांना तुडवत उखडून फेकत नुकसान करीत आला. तसेच तो चिमणीच्या झाडाजवळ देखील पोहचला. व त्याने झाड पाडण्यासाठी झाडाला जोरजोर्यात हलवायला सुरवात केली. झाड खूप मजबूत होते म्हणून हत्ती ते झाड पाडू शकला नाही. तसेच तिथून निघून गेला. पण हत्तीने ते झाड हलवल्यामुळे चिमणीचे घरटे खाली कोसळले होते. व घरट्यातील सर्व अंडी फुटली होती.
तसेच योजने अनुसार मधमाशीने काम सुरु केले.ती हत्तीच्या कानात जाऊन गुणगुण करायला लागली. हत्तीने संगीताचा आस्वाद घेतला आणि हत्ती संगीतात तल्लीन झाल्यावर लाकूडतोड्याने पुढच्या योजनेवर काम करायला सुरवात केली. त्याने हत्तीचे दोन्ही डोळे फाडून टाकले. हत्ती वेदनेने ओरडू लागला. त्यानंतर, बेडूक त्याच्या गटासह एका दलदलीत गेला आणि सर्वजण मिळून आवाज करू लागले. बेडकांचा आवाज ऐकून हत्तीला वाटले की जवळच तलाव आहे. तो त्या आवाजाच्या दिशेने गेला आणि दलदलीत अडकला. अशा प्रकारे हत्ती हळूहळू दलदलीत अडकला आणि मरण पावला.