अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका सुंदर बागेमध्ये अनेक प्रकारचे फळे राहायची. आंबा, सफरचंद, केळे, पेरू, डाळींब, यांचे झाड होते. प्रत्येक फळ स्वतःच अद्वितीय, चवदार आणि सुंदर होते. ते सर्व बागेतील माळी रामुकाकांचे लक्ष आपल्या कडे केंद्रित कसे होईल हे बघायचेत.व रामुकाकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित कसे होईल हे पाहायचे.
बागेमध्ये सर्वात जुने आणि मोठे आंब्याचे झाड होते. त्याचे नाव आंबा राजा असे होते. राजा आंब्याने आपल्या चारही बाजूला लागलेल्या इतर फळांच्या झाडांना आपल्या छत्रछाया सांभाळत होते. आंब्याच्या झाडाचे फळ खूप गोड आणि रसदार होते. प्रत्येक जण त्यांना खाऊन आनंदित व्हायचे.
आंब्याच्या बाजूला एक छोटेसे सफरचंदाचे झाड होते. सफरचंदाचा रंग लाल आणि सुंदर होता. सफरचंदाचे झाडाला नेहमी वाटायचे की, मी देखील आंब्याच्या झाडाप्रमाणे मोठे आणि घनदाट, मजबूत असावे. तसेच सफरचंदाला आपल्या गोडवा आणि रंगावर गर्व होता.
एकदा एक नवीन झाड बागेमध्ये लावण्यात आले. हे झाड होते डाळींबाचे. डाळींब हे चवीला स्वादिष्ट लागते. डाळींबाच्या झाडाचे सर्व झाडांनी स्वागत केले. तसेच त्याला बागेतील नवीन सदस्य बनवले.
एकदा खुप जोऱ्याचे वादळ आले. सर्व झाडे खूप घाबरली. आंब्याच्या फांद्यांनी इतर छोट्या झाडांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण वादळामुळे झाडे वाकायला लागली. तेव्हा डाळींबाने आपल्या मुळा घट्ट रोवून उभा राहिला. व जवळच्या इतर झाडांना देखील आधार दिला.
वादळ गेल्यानंतर राजा अंबाने डाळींबाचे कौतुक केले व म्हणाला की, “तुझ्या या धाडसासाठी आमच्याकडून तुला धन्यवाद! तू आम्हाला शिकवले खरी ताकत आकारात नसते तर हृदयात असलेल्या अंतरिशक्ति मध्ये असते.
यानंतर बागेतील सर्व झाडे एकमेकांचा आदर करू लागली. व आनंदाने राहू लागली. आंबा राजाला सफरचंद, केळी, पेरू आणि डाळिंब या सर्वांवर समान प्रेम आणि आदर होता. प्रत्येकाला समजले की प्रत्येक फळाची स्वतःची एक विशेषतः असते आणि ही विविधता बागेचे खरे सौंदर्य आहे.
अश्याप्रकारे सुंदर बाग सर्व फळांची एकता आणि प्रेमाचे प्रतीक बनली. तिथली सगळी फळं त्यांच्या चवीसाठीच नव्हे तर परस्पर प्रेम आणि पाठिंब्यासाठीही प्रसिद्ध झाली.
तात्पर्य : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते, एकतेचे बळ अनेक संकटांवर मात करते.