कृती-
सर्वात आधी दुधी सोलून किसून घ्यावा लागेल. आता दुधीचा सर्व रस काढावा. मग त्यात बटाटे मॅश करावे. यानंतर लाल मिरची, जिरेपूड, गरम मसाला, धणे, कोथिंबीर, चवीनुसार मीठ असे आवश्यक मसाले मिसळावे.यात ब्रेड ओला करून मिक्स करावे. नंतर आप्पेचे छोटे गोळे बनवावे.यानंतर, आप्पे पॅनमध्ये तेल ग्रीस करावे. मग हे गोळे आप्पे पॅनमध्ये ठेवावे आणि मंद आचेवर शिजवावे. तर चला तयार आहे रविवार स्पेशल नाश्ता दुधी भोपळ्याचे आप्पे रेसिपी सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत नक्कीच सर्व्ह करा.