सर्वात आधी एका पॅनमध्ये बटर गरम करा. नंतर त्यात पीठ घाला आणि मंद आचेवर १-२ मिनिटे सतत ढवळत राहून तळा, जेणेकरून कच्चा चव राहणार नाही. आता हळूहळू कोमट दूध घाला आणि सतत ढवळत राहा जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. थोड्याच वेळात ते क्रिमी सॉससारखे होईल.त्यात किसलेले चीज घाला आणि चीज पूर्णपणे वितळेपर्यंत मिक्स करा. आता त्यात उकडलेले स्वीट कॉर्न घाला आणि चांगले मिक्स करा. नंतर मीठ, मिरे पूड, चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो घाला आणि मिक्स करा. वर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.