सर्वात आधी मोठ्या बाऊलमध्ये बेसन, सोडा आणि सर्व साहित्य घालावे. आता सर्व साहित्य चांगले मिसळा आणि आता हळूहळू पाणी घाला. सतत ढवळत इडलीसाठी जाडसर पीठ तयार करा.
आता हे पीठ १५ मिनिटे झाकून ठेवा. तसेच इडलीच्या साच्यावर तेल लावावे, आता एका मोठ्या भांड्यात पाणी घाला आणि ते गरम करण्यासाठी ठेवा. आता बेसनाच्या पिठात इनो घाला आणि हलक्या हाताने मिसळा. असे केल्याने इडली पूर्णपणे मऊ होईल. आता हे मिश्रण इडलीच्या साच्यात ओता आणि १५ मिनिटे वाफवून घ्या. सुगंध येऊ लागला की तपासा आणि प्लेटमध्ये काढा. आता एका पॅनमध्ये तेल गरम करा. नंतर मोहरी आणि हिरव्या मिरच्या घालून फोडणी तयार करून इडलीवर घाला. तर चला तयार आहे आपली झटपट अशी बेसन इडली रेसिपी, सांबर, हिरव्या चटणीसोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.