कृती-
सर्वात आधी ब्रेड घ्या आणि त्यांचे छोटे तुकडे करा. आता एक पॅन घ्या, त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, कढीपत्ता आणि हिंग घालून परतून घ्या. यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि शेंगदाणे घाला आणि ते परतून घ्या. कांद्याचा रंग सोनेरी झाल्यावर त्यात चिरलेला टोमॅटो, हळद, हिरवी मिरची आणि मीठ घालून सर्वकाही मिसळा. हे मिश्रण गॅसवर २ मिनिटे शिजू द्या. यानंतर ब्रेड तुकडे पॅनमध्ये घाला. नंतर वरून थोडे पाणी शिंपडा. यानंतर हे मिश्रण चांगले मिसळा. तयार ब्रेड उपमा प्लेटमध्ये काढून त्यावर कोथिंबीर गार्निश करा. तर चला तयार आहे आपला ब्रेड उपमा रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा.