कृती-
दही भात बनवण्यासाठी सर्वात आधी भात एका मोठ्या भांड्यात घ्या. त्यात एक चमचा तूप घालून चांगले मिसळा. आता त्यात दोन ग्लास पाणी घाला आणि भात चांगला मॅश करा आणि बाजूला ठेवा. आता एका मोठ्या भांड्यात एक मोठा कप दही घ्या आणि ते चांगले फेटून घ्या. दही फेटल्यावर त्यात चवीनुसार मीठ, जिरेपूड आणि धणेपूड घाला. आता दह्यात एक ग्लास पाणी घाला आणि पुन्हा एकदा चांगले मिसळा. आता पाण्यात मॅश केलेला भात दह्यात घाला आणि मिश्रण चांगले मिसळा. आता एका छोट्या कढईत एक चमचा तेलात एक कढीपत्ता, एक चमचा हरभरा डाळ, एक चमचा उडीद डाळ, अर्धा चमचा जिरे आणि मोहरी घाला आणि ते परतून घ्या. डाळ तपकिरी झाल्यावर त्यात शेंगदाणे, बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला आणि चांगली लाल होऊ द्या. आताआता हा तयार तडक दही भातात घाला. मिक्स करून घ्या. वरून कोथिंबीर गार्निश करा. तर चला तयार आहे दही भाताची रेसिपी.