साहित्य-
एक कप-रवा
अर्धा कप-दही
१०० ग्रॅम-पालक
चवीनुसार मीठ
एक चमचा-मोहरी
अर्धा चमचा-जिरे
दोन हिरव्या मिरच्या
कृती-
सर्वात आधी पालक पाण्यात उकळवा. नंतर पालक बारीक करून पेस्ट तयार करा. एका मोठ्या भांड्यात रवा घ्या आणि त्यात दही घाला. ते चांगले मिसळा आणि सुमारे अर्धा तास तसेच राहू द्या. नंतर त्यात पालक प्युरी घाला आणि गरज पडल्यास पाणी घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा. आता त्यात मसाला घाला. आता एका पॅनमध्ये तेल गरम करा त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालावे. तसेच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घाला. आता ही फोडणी तयार मिश्रणात घाला.आता पॅन गरम करा आणि तेल घाला. त्यावर हे मिश्रण घालून डोसा करतो त्याप्रमाणे पसरवा. तसेच शिजवून घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यावर वरून पनीर, कोथिंबीर गार्निश करू शकतात. तर चला तयार आहे आपली पालक उत्तपम रेसिपी, चटणीसोबत नक्कीच सर्व्ह करा. अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.