Hariyali Teej 2025 हरियाली तीज व्रत कधी? साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

मंगळवार, 15 जुलै 2025 (15:44 IST)
हरियाली तीज हे आपण ऐकले असेल जरी हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणे साजरा केल जात नसला तरी याचे महत्त्व खूप आहे. ही तीज उत्तर भारतातील श्रावण महिन्यात येते जेव्हा पावसाळा पूर्ण जोरात असतो आणि सर्वत्र हिरवळ असते. म्हणूनच या तीजला हरियाली तीज असेही म्हणतात.
 
हरियाली तीज व्रत २०२५
हिंदू पंचागानुसार या वर्षी हरियाली तीजची तारीख २६ जुलै रोजी रात्री १०:४२ वाजता सुरू होत आहे. ही २७ जुलै रोजी रात्री १०:४२ पर्यंत लागू राहील.
 
२७ जुलै रोजी महिला हरियाली तीजचे व्रत पाळतील. यावेळी भगवान शंकर आणि माता पार्वती यांना सजवावे आणि फळे, मिठाई, फुले इत्यादी अर्पण करावीत.
 
हरियाली तीज व्रतासाठी शुभ मुहूर्त
तिथी आरंभ - २६ जुलै २०२५ रात्री १०:४१ वाजता
तिथी संपेल - २७ जुलै २०२५ रात्री १०:४१ वाजता
 
हरियाली तीज पूजा विधी
हरियाली तीजच्या दिवशी, उपवास करणाऱ्या महिलांनी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घालावेत.
यानंतर, हातात फुले आणि अक्षत घेऊन भगवान शिव आणि माता पार्वती यांचे ध्यान करताना उपवास करण्याची प्रतिज्ञा घ्यावी.
पिवळा किंवा लाल कापड एका चौरंगावर पसरवा आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती स्थापित करा.
भगवान शिवाला बेलपत्र, भांग, धतुरा, पांढरी फुले, जनेऊ, सुपारी, अक्षत, दुर्वा, धूप, दीप, कापूर, चंदन इ. तर देवी पार्वतीला सोळा शृंगार वस्तू (जसे की- बांगड्या, सिंदूर, बिंदी, मेहंदी, काजल इ.), हिरवी साडी, फळे, फुले, मिठाई इ. अर्पित करावे.
पूजेनंतर भगवान शिव आणि माता पार्वतीची आरती करा आणि हरियाली तीजची कथा ऐका.
पूजेनंतर, सर्वांना प्रसाद आणि पंचामृत वाटप करा.
हरियाली तीजचे व्रत पाणी न पिता, म्हणजेच निर्जला ठेवले जाते.
दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर स्नान करून पूजा केल्यानंतर, उपवास सोडा.
 
इतर महत्त्वाच्या गोष्टी:
या दिवशी विवाहित महिलांनी सोला शृंगार करणे शुभ मानले जाते.
हरियाली तीजला झुला झुलण्याची प्रथा देखील आहे.
या दिवशी महिला तीजची गाणी गातात आणि उत्सव साजरा करतात.
हरियाली तीजला दान करणे देखील शुभ मानले जाते.
 
हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की हरियाली तीजचा उपवास कठीण मानला जातो, म्हणून जर आरोग्याशी संबंधित काही समस्या असतील तर फळे खाऊनही उपवास करता येतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती