दोन मासे आणि एका बेडकाची गोष्ट

बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (12:30 IST)
अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका सरोवरात दोन मासे आणि एक बेडूक सोबत राहायचे. एका माश्याचे नाव  शतबुद्धि आणि दुसऱ्या माश्याचे नाव सहस्त्रबुद्धि असे होते. तसेच बेडकाचे नाव एकबुद्धि होते. दोन्ही मास्यांना आपल्या बुद्धीवर खूप अहंकार होता. पण बेडूक आपल्या बुद्धीवर कधीही गर्व करायचा नाही. तरी देखील तिघांची घट्ट मैत्री होती. तिघेही सोबत फिरायचे आणि एकत्र गप्पा करायचे.
 
कोणतीही समस्या आली तर तिघेही मिळून त्या समस्यांचा सामना करायचे. एकदा सरोवराच्या किनाऱ्यावरून एक मच्छीमार जात होता. त्याने पाहिले की सरोवरात खूप मासे आहे. मच्छिमार म्हणाला की, उद्या सकाळी येऊन सरोवरातील सर्व मासे पकडून नेईन. बेडूक त्याचा सर्व सवांद ऐकून घेतो.
 
बेडूक सरोवरातील सर्वांचा जीव वाचावा म्हणून मित्रांजवळ जातो. बेडूक शतबुद्धि आणि सहस्त्रबुद्धि यांना घडलेली सर्व घटना सांगतो. एकबुद्धि बेडूक म्हणाला की, “सर्वांनी आपला जीव वाचवण्यासाठी काहीतरी करायला हवे” यावर दोन्ही मासे म्हणायला लागले “आम्ही घाबरून आमच्या पूर्वजांची ही जागा सोडून जाऊ शकत नाही.” आपल्याला घाबरण्याचे कारण नाही. आपल्याजवळ बुद्धी आहे आपण आपले रक्षण करू शकतो. यावर बेडूक म्हणाला की, “मला माहित आहे जवळ एक दुसरे सरोवर आहे.जो सरोवरशी जोडलेला आहे. त्याने सरोवरातील इतर जीवांना देखील सोबत चालण्यास सांगितले. पण कोणीही बेडकाचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार न्हवते. कारण सर्वांना शतबुद्धि आणि सहस्त्रबुद्धि वर विश्वास होता की ते सर्वांचा जीव वाचवतील. 
 
बेडूक म्हणाले “तुम्ही सर्व माझ्यासोबत चला मच्छीमार उद्या सकाळी येतील. पण यावर सहस्त्रबुद्धि म्हणाला की, त्याला सरोवराच्या मागे लपण्याची एक जागा माहित आहे. शतबुद्धि म्हणाला की, मला देखील माहित आहे. यावर बेडूक म्हणाला की, त्यांच्याजवळ मोठे जाळे आहे. तुम्ही त्यांच्या पासून वाचू शकत नाही. पण मास्यांना त्यांच्या बुद्धीवर खूप अहंकार होता. त्यांनी बेडकाचे ऐकले नाही. पण बेडूक त्याच रात्री तिथून निघून गेला.
 
शतबुद्धि आणि सहस्त्रबुद्धि ने एकबुद्धिची खिल्ली उडवली. आता दुसऱ्या दिवशी सकाळी मच्छीमार आपले मोठे जाळे घेऊन सरोवराजवळ आले. त्यांनी सरोवरात जाळे टाकले. सरोवरातील सर्व जीव आपला जीव वाचवण्यासाठी इकडेतिकडे पळू लागले. पण उपयोग झाला नाही अनेक मासे त्या जाळ्यामध्ये अडकले. शतबुद्धि आणि सहस्त्रबुद्धि ने स्वतःला वाचवण्याचा अथांग प्रयत्न केला पण ते सुद्धा जाळ्यामध्ये अडकले.
 
जेव्हा त्यांना पाण्यामधून बाहेर काढले तेव्हा त्यांचा मृत्यू झालेला होता. शतबुद्धि आणि सहस्त्रबुद्धिचा आकार खुप मोठा होता. याकरिता त्यांना वेगळे ठेवण्यात आले. त्यांनी बाकी मास्यांना एका टोपली मध्ये टाकले व शतबुद्धि आणि सहस्त्रबुद्धि यांना खांद्यावर घेऊन निघाले. जेव्हा ते दुसऱ्या सरोवराजवळ पोहचले तेव्हा एकबुद्धि बेडकाची नजर त्यांच्यावर पडली. त्याला आपल्या मित्रांची ही अवस्था पाहून वाईट वाटले. पाहून वाईट वाटले. बेडूक म्हणाला की माझे ऐकले असते तर आज हे जिवंत राहिले असते. 
 
तात्पर्य : कधीही आपल्या बुद्धीवर अहंकार करू नये. एक दिवस हाच अहंकार जीवघेणा ठरू शकतो.

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती