नपुंसकत्व येण्याची कारणं

जीवनात सेक्सचा वेगळाच आनंद आहे आणि उत्जेनामुळे याची उत्पत्ती होते. कधी-कधीतर काही लोकं एखादी सेक्सी फोटो बघून देखील उत्तेजित होऊन जातात. पण शिश्न ताठ होत नसल्यास त्याला नपुंसकत्व (इरेक्टाइल डिस्फंक्शन) म्हणतात. ही समस्या असणारे लोकं सतत चिडचिड करतात, त्यांना नैराश्य येतो आणि त्यांचा आत्मविश्वासही ढासळतो.
साधरणता पुरुषांमध्ये 60 वर्षाच्या वयानंतर तर स्त्रियांमध्ये 45 वर्षाच्या वयानंतर हार्मोन्सची कमतरता होते ज्यामुळे त्यांना उत्तेजित व्हायला वेळ लागतो किंवा ते उत्तेजित होतंच नाही.
 
काय आहे हे इरेक्टाइल डिस्फंक्शनचे कारण, पाहू या..
 
* अतिमद्यपानाने माणसाच्या सेक्स लाईफवर विपरित परिणाम होतो. तणाव, दारू, धूम्रपान आणि मधुमेहामुळे सेक्स लाईफवर परिणाम होतो.
 
* हार्मोन्स विकारही इरेक्टाइल डिस्फंक्शन अर्थात नपुंसकत्वासाठी कारणीभूत ठरतं.
 
* नर्वस सिस्टममध्ये एखाद्या कमतरतामुळे ही समस्या आढळते.


* लिंगमध्ये रक्ताचा प्रवाह बरोबर नसल्यास सेक्स करणे अशक्य होतं.
 

* सेक्सबद्दल विचार करण्यासाठी मेंदूत एक विशेष केंद्र असतं, जिथून सेक्ससंबंधित भावना नियंत्रित होतात. या भागात काही विकार असल्यास इरेक्टाइल डिस्फंक्शन होऊ शकतं.
* नकारात्मक विचारामुळेही सेक्समध्ये यश मिळतं नाही. काही लोकांच्या मनात अपयशाची भीती असते. अशा भावनिक ताणामुळे ते सेक्सपासून दुरावतात.
 

* चिकित्सक म्हणतात की 80 टक्के लोकांमध्ये इंद्रिय शिथिलतेचे कारण शारीरिक असून केवळ 20 टक्के लोकांमध्ये मानसिक स्थिती यासाठी जबाबदार ठरते.
 

उपचार: नपुंसकत्व रोखण्यासाठी नियमित व्यायाम करणे उत्तम मार्ग आहे. ज्यामुळे शरीरात रक्त प्रवाह सुरळीत होतो. समस्या वाढण्यापूर्वीचं डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वोत्तम ठरेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती