किती लोकं घेतात रेग्युलर सेक्सचा आनंद

सेक्स करणे ही शारीरिक गरज असली तरी याने मानसिक सुखही प्राप्त होतं हेही तेवढंच खरं आहे. परंतू सेक्स करण्यासाठी मन फ्रेश, शरीराने फीट असण्याचीही तेवढीच गरज असते. हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे लोकांचे सेक्स लाईफ एन्जाय करण्याकडे दुर्लक्ष होतं. कितीदा मूड नाही तर ‍कधी थकवा अश्या गोष्टीमुळे सेक्समधील रुची संपायला लागते. अशात बघू या भारतात किती लोकं आहे जे दररोज सेक्सचा आनंद घेतात.
एका संशोधनाप्रमाणे, देशात केवळ 19 टक्के लोकं असे आहेत जे नियमित सेक्सचा आनंद घेतात. इतर लोकांचे सेक्स करण्याचे प्रमाण निश्चित कमी आहे. काही आठवड्यातून एकदा तर काही दोनवेळा अर्थातच आपल्या सोयीप्रमाणे आनंद घेतात.
 
तसेच 30 वयापर्यंतचे लोकं सेक्सचा भरपूर आनंद घेतात परंतू यातूनही 20 टक्के लोकांनी वर्कलोडमुळे सेक्ससाठी मूड होत नाही किंवा वेळ मिळत नसल्याचे म्हटले.

वेबदुनिया वर वाचा