तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे लक्षण

गुरूवार, 13 जून 2019 (15:54 IST)
मागील काही वर्षांमध्ये सेक्‍शुएलिटीबद्दल लोक जास्त खुलून बोलू लागले आहे. आता या मुद्द्यांवर प्रत्येक व्यक्ती आपले विचार आणि आवड निवड व्यक्त करू लागला  आहे. अलैंगिक, हा एक असा शब्द आहे ज्याबद्दल आतापर्यंत तुम्ही फारच कमी किंवा कदाचित ऐकले ही नसेल. यात ते लोक येतात ज्यांना सेक्सची इच्छा नसते किंवा जे रिलेशनशिपबगैर संबंध बनवण्यास तयार होऊन जातात आणि ते लोक मुलगी असो की मुलगा दोघांशी संबंध बनवण्यास तयार होऊन जातात.  
 
डेमिसेक्‍शुअलचा अर्थ काय ? 
जर तुम्ही डेमिसेक्‍शुअल असाल तर तुम्हाला फक्त त्या लोकांसोबत सेक्स करण्याची इच्छा होईल ज्याच्याशी तुम्ही प्रेम करता किंवा ज्या लोकांसोबत तुम्ही भावनात्मक  जुळलेले आहात. डेमिसेक्‍शुएलिटीला ग्रे सेक्‍शुएलिटी देखील म्हटले जाते ज्यात सेक्सच सर्व काही नसत.   
 
डेमिसेक्‍शुअल कशे असतात ? 
आपल्या पार्टनरसोबत सेक्स करण्याअगोदर डेमिसेक्‍शुअल लोकांना एक खोल भावनात्मक प्रतिबद्धतेची गरज असते. हे बगैर प्रेमाचे कोणाशीही संबंध ठेवत नाही. यांच्यासाठी भावनात्मक नात सेक्सपेक्षा जास्त महत्त्वाचे असते.  
 
डेमिसेक्‍शुअल आणि अलैंगिकमध्ये काय फरक आहे? 
अलैंगिक लोकांना सेक्स बिलकुल आवडत नाही आणि यांच्यात सेक्स करण्याची इच्छाही जागृत होत नाही. तसेच दुसरीकडे डेमिसेक्‍शुअल व्यक्ती सेक्ससाठी फक्त त्याच लोकांप्रती उत्तेजित होतो ज्याच्याशी ते प्रेम करतात.  
 
संबंधांमधील सेक्सला प्राधान्य देणे हे आवश्यक असते का ?
बर्‍याच लोकांना रिलेशनशिपमध्ये राहणे पसंत असत पण तरी देखील ते दुसर्‍या व्यक्तीसोबत सेक्स करण्याची इच्छा ठेवतात. डेमिसेक्‍शुअल व्यक्तीला सेक्स करण्याची इच्छा फक्त त्यांच्याबरोबच होते ज्याच्याशी ते प्रेम करतात.  
LGBTQ+ मध्ये येतात डेमिसेक्‍शुअल? 
डेमिसेक्‍शुअल व्‍यक्‍ति LGBTQ+ पासून थोडा वेगळा असतो. त्यांना या श्रेणीत ठेवू शकत नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती