लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवणे अगदी सामान्य प्रक्रिया आहे. अरेंज विवाहात अनेकांना प्रश्न पडतो की अंतरंग संबंधांचा खरंच वैवाहिक जीवनावर प्रभाव पडतो का किंवा एकमेकांना जाणून न घेता कशा प्रकारे संबंध ठेवावे किंवा संबंध योग्य रित्या ठेवले नाही तर यावर नात्याचं यश टिकून आहे का, काय या शिवाय या नात्याचं काहीच अस्तित्व नाही?
तर शारीरिक संबंधांबद्दल प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात. मूळ रूपात बघितले तर हे प्रेम प्रदर्शित करण्याचा एका मार्ग आहे. जेव्हा दोन लोकं एकमेकांबद्दल पूर्णपणे आश्वस्त होऊन जाता तेव्हा असे संबंध निर्मित होतात.
आमच्या समाजात लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवणे योग्य मानले गेले आहे परंतू हल्ली लिव्ह-इन रिलेशनशिपने हे विचार मागासून लावले आहे. परंतू अशात नाते टिकवून ठेवण्यासाठी इंटिमेसी कितपत महत्त्वाची आहे हे जाणून घेणे ही आवश्यक आहे.
1. प्रेम दर्शवण्याचा मार्ग
कोणत्याही नात्यात शारीरिक संबंध किंवा अंतरंग संबंध अत्यंत महत्त्वाचे असतात कारण हे प्रेम दर्शवण्याचा आणि बंधन घट्ट करण्याचा तो एक सुंदर मार्ग आहे. अनेकदा बघितले गेले आहे की ज्या नात्यात सेक्सची कमी असते त्यात दुरावा देखील लवकर निर्माण होते.
2. विश्वास आणि रुची
सेक्सुअल लाईफमुळे पार्टनर्समधील समज कळून येते. एकमेकांप्रती आकर्षक, रुची, विचार कळून येतात. आपसात शारीरिक संबंध म्हणजे विश्वासाचे प्रतीक आहे.
3. ताण दूर करण्यास फायदेशीर
अनेक शोधांमध्ये सिद्ध झाले आहे की सेक्स केल्याने ताण कमी होतो. थकवा दूर होतो सोबत वाद, भांडणं यावर नियंत्रण राहतं. कारण एकमेकाची भूक शांत करण्यासाठी इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करणे हाच योग्य पर्याय ठरतो.
4. असुरक्षिततेची भावना कमी करण्यासाठी
पार्टनरसोबत सेक्स म्हणजे त्याने पूर्णपणे स्वत:ला आपल्याला सोपवले असे आहे. दोघांमध्ये लपवण्यासारखे काही नाही. याने विश्वास वाढतो आणि असुरक्षतेची भावना दूर होते.
5. आरोग्यासाठी फायदेशीर
निरोगी राहण्यासाठी सेक्स एक उत्तम व्यायाम आहे. याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. सेक्सनंतर निर्मित होणार्या हॉर्मोन्समुळे शरीराची प्रतिरोधक क्षमता वाढते. या दरम्यान कॅलरीज बर्न होते ज्याने व्यायाम करण्याइतका फायदा होतो.