मूड बनवा, हे टिप्स अमलात आणून आनंद घ्या

रिलेशनशिपमध्ये शारीरिक संबंधाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सुरुवातीला काही न करता देखील उत्साह असतो नंतर धावपळीमुळे किंवा इतर जबावदार्‍यांमुळे सेक्स लाईफकडे दुर्लक्ष होतं. अशामुळे नात्यावर वाईट परिणाम होतो. आपल्यालाही असे वाटतं असेल की पुन्हा नातं फ्रेश करण्याची गरज आहे तर काही सोपे टिप्सने आपण पुन्हा त्या क्षणांचा आनंद घेऊ शकता.
 
स्पेशल डे 
कितीही व्यस्त असला तरी एक दिवस किंवा काही काळ एकमेकांसोबत घालवावा. या दरम्यान आपण सोबत ब्रेकफास्ट तयार करणे किंवा सोबत सिनेमा बघणे किंवा फिरायला जाणे असे काही प्लान करू शकता. पण शक्योतर या प्लानिंगमध्ये केवळ आपण दोघंच असावे. तिसर्‍याला यात सामील केलं तर मूड जाऊ शकतो. 
 
रोमांटिक गोष्टी
आपलं रिलेशन जुनं झालं म्हणून रोमांटिक गोष्टी काय करायचा असा विचार करत असाल तर हे चुकीचं आहे. रोमांसला नेहमी जिवंत ठेवावं. रोमांटिक हालचाली किंवा गोष्टी केल्याने दुरावा कमी होतं आणि पुन्हा एकमेकाप्रती फिलिग्स वाटू लागतात.
 
कँडल लाइट डिनर 
कितीही नाकारले तरी कँडल लाइट रोमांटिक डिनर डेटमुळे मूड बनतं. ही डेट निश्चितच कपल्सला जवळ येण्यात मदत करते.
 
गिफ्ट 
एकमेकांना सेक्सी गिफ्ट देण्यात लाजण्यासारखे काहीच नाही. काही गिफ्ट्सने सेक्शुअल रिलेशनशिपची इच्छा असल्याचे कळून येतं आणि साथीदाराने गिफ्ट स्वीकारणे म्हणजे आपण पुढे वाढू शकता.
 
फोरप्ले
फोरप्ले न करता संबंध बनवणे म्हणजे आपली भूक भागवण्यासारखे आहे म्हणून सेक्स दरम्यान रोमांस करणे टाळू नये. याने मूड बनतं आणि दोघांच मूड बनल्यावर पुढे वाढण्याचा मजा काही औरच असतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती