गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या महादेवी माधुरी हत्तीणी चर्चेत आहे. महादेवी माधुरी हत्तीणीची वंतांरा मध्ये पाठवणी केल्यावर नागरिकांमध्ये रोष आहे. तिची पाठवणी करताना लोकांच्या डोळ्यात पाणी आलं.कोल्हापूरकरांनी यावरून अंबानींचा निषेध केला असून जिओ कार्डावर बंदी घातली. कोल्हापुरात यावरून वातावरण तापलं आहे. महादेवी माधुरीला परत कोल्हापुरात देण्याची मागणी नागरिक करत आहे.
या वरून राज्य सरकार आता सक्रिय मोड मध्ये आली असून राज्य सरकार आणि मठ पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला.
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महादेवी हत्तीणीला वंतारा पाठवण्याचा निर्णय राज्य सरकारचा नसून सर्वोच्च न्यायालयाचा आहे. त्या निर्णयाचे पालन करण्यात आले. आणि महादेवीची पाठवणी वंतारा केली. आता जनतेच्या भावनेच्या आदरासाठी महादेवीला पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी आम्ही मध्यस्थी करत आहोत.
गेल्या 34 वर्षांपासून महादेवी माधुरी हत्तीणी नांदणी मठात आहे. ती पुन्हा नांदणी यावी अशी कोल्हापूरकरांची इच्छा आहे. या साठी नांदणी मठाने एक याचिका दाखल करावी तसेच यासोबत राज्य सरकार देखील याचिका दाखल करणार आहे. महादेवी माधुरीची काळजी घेण्यासाठी राज्य सरकार डॉक्टरांसह एक पथक तयार करेल या संदर्भात माहिती सर्वोच्च न्यायालयात देण्यात येईल. हत्तीणीची काळजी घेण्यासाठी राज्यसरकार आवश्यक ती मदत करेल.
रेस्क्यू सेंटर तिच्या आहाराची काळजी घेण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाला आश्वस्त करेल. जशी व्यवस्था वंतारा येथे आहे तशीच व्यवस्था महाराष्ट्र वनखाते आणि राज्य शासन उभारणार आहे. माधुरी हत्तीणी पुन्हा कोल्हापुरात येईल अशा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.
या बैठकीला अजित पवार, चंद्रकांत पाटील, सतेज पाटील, हसन मुश्रीफ, गणेश नाईक, धैर्यशील माने, गिरीश महाजन, प्रकाश आबिटकर, प्रकाश आवाडे, राजू शेट्टी, सदाभाऊ खोतआणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते