घर वाचवण्यासाठी मराठमोळ्या अभिनेत्याच्या आवाहनावर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

मंगळवार, 12 ऑगस्ट 2025 (17:29 IST)
माझं घर वाचवा म्हणत मराठमोळ्या अभिनेता आणि कवी सौमित्र म्हणजे किशोर कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मदतीची विनंती केली आहे. 
ALSO READ: महायुती सरकारचे मोठे यश, शिवाजी महाराजांच्या 'वाघनाख' नंतर रघुजी भोसले यांची तलवार महाराष्ट्रात येणार
किशोर कदम यांनी त्यांच्या अंधेरीतील चकाल्यातील हवा महल सोसायटीच्या पुनर्विकासासाठी होणाऱ्या प्रक्रियेत गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला असून या अनियमिततेमुळे त्यांच्यासह सोसायटीतील इतर 23 घरे धोक्यात आली असून सोसायटीच्या कमिटीने सभासदांना अंधारात ठेवून महत्वाची कागदपत्रे लपवली असून, पुनर्विकासाशी संबंधित निर्णय पारदर्शकपणे घेतले गेले नाहीत. त्यामुळे या प्रक्रियेत तातडीने हस्तक्षेप करून सदस्यांचे हक्क अबाधित ठेवावेत, अशी त्यांची मागणी  करत त्यांनी घराच्या सुरक्षिततेसाठी फेसबुकवर पोस्ट करत मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना मदतीचे आवाहन केले.
ALSO READ: जैन समाजाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, बीएमसीने ३२००० रुपयांचा दंड वसूल केला, ३ प्रकरणे दाखल
त्यांनी केलेल्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.  फडणवीसांनी किशोर कदम यांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे."किशोरजी आपली तक्रार मी सहकार सचिव प्रवीण दराडे आणि एसआरएचे मुख्या कार्यकारीअधिकारी महेंद्र कल्याणकर यांना कळवली असून त्यांना तातडीने या प्रकरणात लक्ष घालून आपल्याशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. 
 
Edited By - Priya Dixit  
 
ALSO READ: महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी हंगाम सुरू, किनारी जिल्ह्यांवर आणि विदर्भावर ढग दाटून आले, आयएमडीने इशारा दिला

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती