पुण्याला पावसाने झोडपले

रविवार, 9 जून 2024 (10:33 IST)
पुणे शहर आणि परिसरात शनिवारी (दि.08 जून) सायंकाळी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर, पाषाण भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन या विषयीची सविस्तर माहिती घेतली.
 
जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी तसेच विस्कळीत झालेली वाहतुक तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. या काळात नागरीकांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
 
नागरीकांनी काळजी घ्यावी. तसेच येत्या पाच दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याअनुषंगाने राज्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्क राहण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
शनिवारी दुपारनंतर सुरू झालेल्या मुसळधार पाऊसामुळे अप्पर ओटा याठिकाणी झाड पडून एका व्यक्तीच्या मृत्यू झाला असून अग्निशमन दलाकडे आज पहाटे पर्यंत शहराच्या विविध भागात झाडपडीच्या एकुण 55 तसेच पाणी साचले/शिरले अशा 22 आणि भिंत पडल्याची 1 अशा एकुण 79 घटनांची नोंद झाली.
 
अग्निशमन दलाच्या जवानांनी मध्यराञी लोहगाव, कलवड वस्ती येथून पाण्यात अडकलेल्या 3 व्यक्तींची सुखरुप सुटका केली असून जवान अद्याप विविध वर्द्यांवर कार्यरत आहेत
Edited by - Priya Dixit    

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती