ठाकरे गटाचे दोन खासदार शिंदे गटाच्या संपर्कात, नरेश म्हस्के यांचा दावा

शनिवार, 8 जून 2024 (20:39 IST)
ठाकरे गटातील दोन खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. ते आज प्रसार माध्यमाशी बोलत होते. 

म्हस्के म्हणाले, अनेक खासदार आणि नगरसेवक शिवसेना लोकप्रतिनिधीच्या मूळ प्रवाहात येऊ इच्छित असून मुख्यमंत्री स्थानिक प्रतिनिधींशी संपर्क करून या बाबत निर्णय  घेणार आहे. 

ते म्हणाले, ठाकरे गटातील दोन खासदार आमच्याशी संपर्कात आहे. मोदींना पाठिंबा द्यायचा आहे. आपल्या मतदार संघात कामे झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे. आम्हाला उद्धव ठाकरे याची भूमिका मान्य नसल्याचे खासदार म्हणाले. 
 
म्हस्के यांच्या केलेल्या दाव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मोठी राजकीय घडामोड होणार आहे. 
 
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यातून ठाकरे गटाचे 9 खासदार निवडून आले आहे. तर शिंदे गटाचे 7 खासदार निवडून आले आहे. ठाकरे गटातील दोन खासदार आमच्या संपर्कात आहे. असा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. पक्षांतर बंदीची कारवाई रोखण्यासाठी या दोन खासदारानी प्लॅन आखल्याचे म्हस्के म्हणाले.
 
Edited by - Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती