Rain Update : पुढील चार दिवस या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

रविवार, 9 जुलै 2023 (14:04 IST)
राज्यात पाऊस सक्रिय झाला असून पुढील चार दिवस पुण्यासह मध्य महाराष्ट्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. होसाळीकर यांनी ही माहिती दिली. 
 
राज्यात पुढील चार ते पाच दिवस जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज विचारात घेऊन कामाचे नियोजन करा असं त्यांनी म्हटलं आहे. पुणे, सातारा, कोल्हपूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नाशिक, पालघर, ठाणे, वर्धा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया या भागातही येत्या काळात पाऊस जोर धरणार आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 
भारतीय हवामान खात्यानं पुढील 4 ते 5 दिवस तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या भागात रेड अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
 
Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती