Maharashtra Marathi Breaking News Live Today :मुंबईतील मंत्रालयाच्या इमारतीवरून एका व्यक्तीने उडी मारल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने मंत्रालयाच्या सुरक्षा जाळ्यात अडकून त्याचे प्राण वाचले. विजय साष्टे असे या व्यक्तीचे नाव आहे.विजय साष्टे हे पुण्यातील माळवाडी परिसरातील रहिवासी असून त्यांचे वय 41 वर्ष आहे. पास घेऊन ते मंत्रालयात दाखल झाले. महसूल विभागातील काम होत नसल्याने त्यांनी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून उडी घेतली. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....