लाडकी बहीण योजना बंद होणार, काँग्रेसच्या खासदाराचा दावा

बुधवार, 26 फेब्रुवारी 2025 (11:55 IST)
सध्या लाडकी बहीण योजनेबद्दल संभ्रम आहे ही योजना बंद होणार का? अशी चर्चा सुरु आहे. या योजनेतून ९ लाख बहिणी अपात्र घोषित झाल्या असून सरकारचे या योजनेतून 1620 कोटी रुपये वाचले आहे. ही योजना बंद करण्याची योजना राज्य सरकारची असल्याचा आरोप  काँग्रेसच्या खासदाराने केला आहे. 
ALSO READ: घरात घुसून वृद्धाची गळा चिरून हत्या, नागपूरची घटना
जालनाचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी लाडकी बहीण योजना हळूहळू बंद करण्याचा दावा केला आहे. 9 लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात आले आहे. पण हा आकडा 50 लाख होणार असल्याचा दावा काळे यांनी केला आहे. 
ALSO READ: फ्रेंच कंपनीने एमएमआरडीएवर गंभीर आरोप केले,काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल
ही लाडकी योजना सरकारच्या तिजोरीतून मते खरेदी करण्याचा कार्यक्रम होता. असा आरोप कल्याणराव काळे यांनी केला आहे. ते पैसे बहिणींना योजना म्हणून दिले नसून मतांसाठी दिल्याचा खळबळजनक आरोप काळे यांनीं केला आहे. खरं तर महायुतीचे खरे रूप आता समोर येत आहे. त्यांचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे आहे. असा आरोप त्यांनी केला आहे. 
ALSO READ: जयंत पाटील चंद्रकांत बावनकुळेंना भेटले, राजकीय चर्चेला उधाण
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये देण्यात आले नंतर महायुती सरकारने रक्कम 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले. तसा घोषणा देखील करण्यात आल्या.पण त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या पुढे बहिणींना त्यांच्या खात्यात पैसे मिळणार की नाही हे स्पष्ट आहे. हळुहळू ही योजना महायुती सरकार गुंडाळण्याचा दावा त्यांनी केला आहे. 
 
Edited By - Priya Dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती