दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियम मध्ये शिंदे यांच्या उपस्थितीत अजित पवार म्हणाले की, अलीकडेच एकनाथ शिंदे यांनी मला हलक्यात घेऊ नका असा वाक्प्रचार वापरला होता. ते कोणासाठी होते अद्याप स्पष्ट झालेले नाही.
एका कार्यक्रमादरम्यान शिंदे म्हणाले की, मला हलक्यात घेऊ नका हा वाक्प्रचार दोन वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेच्या संदर्भात होती. सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात महायुती सरकार मध्ये सर्व काही ठीक नसल्याचे बोलले जात आहे. अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टांगा पलटी हे विधान समोर आले आहे.
नागपुरात पत्रकारांनी त्यांना त्यांच्या विधानाबद्दल प्रश्न विचारला असताना मी बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा कार्यकर्त्या आहे. मला हलक्यात घेऊ नका असे उत्तर दिले.