मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून एका व्यक्तीने उडी मारली
बुधवार, 26 फेब्रुवारी 2025 (12:45 IST)
मुंबईतील मंत्रालयाच्या इमारतीवरून एका व्यक्तीने उडी मारल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने मंत्रालयाच्या सुरक्षा जाळ्यात अडकून त्याचे प्राण वाचले. विजय साष्टे असे या व्यक्तीचे नाव आहे.
विजय साष्टे हे पुण्यातील माळवाडी परिसरातील रहिवासी असून त्यांचे वय 41 वर्ष आहे. पास घेऊन ते मंत्रालयात दाखल झाले. महसूल विभागातील काम होत नसल्याने त्यांनी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून उडी घेतली. जमिनीच्या प्रकरणात फसवणूक झाल्यानंतर ही व्यक्ती न्याय मागण्यासाठी आली होती.
उडी घेतल्यावर विजय सुरक्षा जाळीवर पडला नंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवले. त्याला रुग्णालयात नेण्यात आले जिथे त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
सदर घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे त्यात दिसून येत आहे की एक व्यक्ती सुरक्षा जाळीवर पडला असून सुरक्षा कर्मचारी त्याला वाचवत आहे.
जमिनीच्या बाबतीत त्याची फसवणूक झाली आहे. प्रशासनाकडून न्याय मिळण्यास विलंब होत असल्याने तो निराश झाला होता, त्यामुळे त्याने हे पाऊल उचलले.विजय विरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.