अग्निशमन दलाने सांगितले की, कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, आरे कॉलनीतील पर्यावरण-संवेदनशील भागात आगीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले की बिबट्यांना मानवी वस्तीजवळ येऊ नये म्हणून जाणीवपूर्वक आग लावली जाते. आरे हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून आहे आणि या भागात मानवी वस्तीत बिबट्या घुसताना अनेक वेळा दिसले आहेत. पर्यावरण कार्यकर्ते संदीप आठल्ये म्हणाले, " आरेमध्ये जाणीवपूर्वक जाळण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही, परंतु लोक येत राहतात."