पालघर जिल्ह्यात पोलिसांनी 14 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केला असून त्या नोटांवर चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया असे लिहिले होते. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोक पाली गावात बनावट नोटा खऱ्या नोटयात बदलण्यासाठी पोहोचणार असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांच्या पथकाने 22 फेब्रुवारी रोजी सापळा रचला.
पोलिसांना त्या परिसरात एक माणूस संशयास्पद पद्धतीने फिरताना दिसला नंतर एका वाहनातून काही जण आले आणि त्या व्यक्तीशी बोलू लागले. नंतर पोलिसांच्या पथकाने त्यांना अटक केली. तपासा दरम्यान त्यांच्याकडून 100 आणि 500 रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहे. ज्यांची किंमत 14 लाख आहे.
कार मधून देखील दोघांकडून 1 लाख रुपयांच्या खऱ्या चलनी नोटा देखील सापडल्या आहे. या मध्ये जप्त नोटांमध्ये वरील आणि खालील बाजूस खऱ्या नोटा ठेवण्यात आल्या आणि मध्ये चिल्ड्रन बँकेच्या बनावट नोटा ठेवण्यात आल्या होत्या.
त्यांनी 3 लाख रुपयांच्या बनावट नोटा 1 लाख रुपयांच्या खऱ्या नोटांमध्ये बदलण्याची योजना आखली होती. तिघांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.