Maharashtra Marathi Breaking News Live Today : महाकुंभमेळ्यादरम्यान त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या कुटुंबासह पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांचे काही कार्यकर्ते आणि शिक्षणमंत्री दादा भुसे आणि उदय सामंत यांच्यासह पक्षाचे कार्यकर्तेही उपस्थित होते.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दावा केला की शिवसेनेत (UBT) पदे पैशाने मिळवली जातात, ज्यामध्ये मर्सिडीज कार भेट म्हणून देणे देखील समाविष्ट आहे. त्या पुढे म्हणाल्या, संजय राऊतांनी मला आमदार बनवण्याचा प्रयत्न केला मी काहीही दिले नाही. पक्षाने माझ्याकडून काहीही मागितले नाही.