मिळालेल्या माहितीनुसार भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ४ बांगलादेशी महिला आणि त्यांना आश्रय देणाऱ्या एका व्यक्तीला सोमवारी (२१ जुलै) जिल्हा आणि सत्र न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठवले. संशयित महिलांनी सुरतमधून बनावट आधार कार्ड बनवल्याचे उघड केले आहे. नाशिकमधील गुन्हे शाखा युनिट एक आणि अंबड पोलिसांनी संयुक्तपणे अमृतधाम परिसरातील खैरेमला येथे छापा टाकला.