मिळालेल्या माहितीनुसार एटापल्ली तालुका आदिवासीबहुल आहे. अनेक गावे घनदाट जंगलांनी व्यापलेली आहे. तालुक्यात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. नद्या आणि कालव्यांमुळे सरकारी आरोग्य यंत्रणा गावांपर्यंत पोहोचू शकत नाही. बनावट डॉक्टर याचा फायदा घेतात. कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसलेले डॉक्टर विविध आजारांवर उपचार करतात. बनावट डॉक्टर रुग्णाची प्रकृती बिघडेपर्यंतच उपचार करतात. रुग्ण शेवटच्या टप्प्यात पोहोचल्यावर त्याला सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. पण तोपर्यंत वेळ निघून जातो. कधीकधी रुग्णाला आपला जीवही गमवावा लागतो. जिल्ह्यात अशा अनेक घटना घडल्या आहे. आता एटापल्लीच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी बनावट डॉक्टर शोधण्यासाठी मोहीम सुरू केली. अशी माहिती समोर आली आहे.