पुण्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर काही पूल दुरुस्त करून वापरता येतील, परंतु काही पूल धोकादायक असल्याने ते पाडण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. हिंजवडीतील वाहतूक कोंडी, जिल्ह्यातील पुलांची सद्यस्थिती इत्यादी मुद्द्यांवर रविवारी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर पवार माध्यमांशी बोलत होते.