दिल्ली विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाच्या विमानाला आग लागली

मंगळवार, 22 जुलै 2025 (18:31 IST)
एअर इंडियाच्या विमानात आग लागल्याची घटना दिल्ली विमानतळावर घडली आहे. हे विमान हाँगकाँगहून दिल्लीत उतरले होते. लँडिंगनंतर लगेचच एअर इंडियाच्या विमानाला आग लागली. अशी महिती सांवर आली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाच्या विमानात आग लागल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली विमानतळावर लँडिंग दरम्यान विमानात ही आग लागली आहे. हाँगकाँगहून दिल्ली विमानतळावर एअर इंडियाचे विमान उतरताच एअर इंडियाच्या विमानाच्या ऑक्झिलरी पॉवर युनिट (एपीयू) ला आग लागली. सर्व प्रवासी आणि कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. 
ALSO READ: 'कसे खेळायचे ते मला माहित नाही, मी मानहानीचा खटला दाखल करेन', व्हिडिओ गेम खेळण्याच्या आरोपांवर कृषीमंत्री कोकाटेंची प्रतिक्रिया
याबाबत अधिक माहिती एअर इंडियाने दिली आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मंगळवारी, हाँगकाँगहून दिल्लीला जाणारी फ्लाइट क्रमांक एआय ३१५, लँडिंगनंतर लगेचच ऑक्झिलरी पॉवर युनिट (एपीयू) मध्ये आग लागली आणि गेटवर पार्क केली. प्रवाशांनी उतरण्यास सुरुवात केली तेव्हा ही घटना घडली.  यासोबतच, एअर इंडियाने सांगितले की आगीमुळे विमानाचे काही नुकसान झाले आहे. तथापि, प्रवासी आणि क्रू मेंबर्स सामान्यपणे उतरले आहे आणि ते सुरक्षित आहे.  
ALSO READ: ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक विजेत्याला सात कोटी रुपये मिळणार सोबत नोकरीही दिली जाणार; दिल्ली सरकारची मोठी घोषणा
Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती