मुख्यमंत्र्यांचा पीए असल्याची बतावणी करून चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्याला कामावर हजर करून घेण्यासाठी तोतयेगिरी करणाऱ्या इसमाविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की दि. 28 व 29 नोव्हेंबरदरम्यान फिर्यादी प्रतापसिंग बाबूराव चव्हाण (वय 67) यांना अज्ञात इसमाने फोन करून मुख्यमंत्र्यांचा पीए कानडे बोलत असल्याचे सांगितले. त्याने चव्हाण यांना सक्तीच्या रजेवर असलेले व चौकशी सुरू असलेले शैलेश पिंगळे यांना एन. डी. सी. सी. बँकेत त्वरित कामावर हजर करून घेण्यास सांगितले.
चव्हाणांना तोतयेगिरीची शंका आल्याने त्यांनी फोन करणाऱ्या अज्ञात इसमाच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार करीत आहेत.