राज्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या वतीने पीक कर्ज वसुलीसाठी स्थगिती देण्यात आली आहे. दुष्काळ आणि दुष्काळसदृश्या परिस्थितीत घोषित केलेल्या 40 तालुक्यांमध्या ही स्थगिती असणार आहे. यासोबतच इतर तालुक्यांतील एकूण 1021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून खालील सवलती लागू करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.
4) कृषी पंपाच्या चालू विजबिलात ३३.५% सूट.
5) शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परिक्षा शुल्कात माफी.
6)रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता.
7) आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर.
8)टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे.
या निर्णयानुसार विविध सवलतीपोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांचे सोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये नमूद केलेल्या 10316 महसुली मंडळामध्ये उपाययोजना तातडीने अंमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.