पुणे: जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोमवारी रात्री १२ वाजता काही अज्ञात हल्लेखोरांनी शिवसेना शिंदे गटातील युवा नेत्याच्या गाडीवर गोळ्या झाडल्या. गोळ्यांच्या आवाजाने परिसर दुमदुमून गेला. गोळीबाराचा आवाज ऐकून स्थानिक लोक घराबाहेर पडले, पण तोपर्यंत गुन्हेगार पळून गेले होते. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.