पुण्यात सीबीआय अधिकारी बनून डॉक्टरची 28 लाखांची फसवणूक

रविवार, 1 डिसेंबर 2024 (16:08 IST)
इंटरनेटमुळे जितके आपले काम सोपे झाले आहे तितकेच त्याचा वापर करण्याचे धोकेही वाढले आहेत. आजकाल, फसवणूक करणारे सक्रिय आहेत जे लोकांना डिजिटल अटक करून फसवतात.  डिजिटल अटक ही एक प्रकारची सायबर फसवणूक आहे, ज्यामध्ये फसवणूक करणारे लोक तुम्हाला अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲपवर कॉल करतात किंवा कॉल करतात.
 
चिंचवडमधील एका डॉक्टरला अनोळखी व्यक्तीने फोन करून तो सीबीआय अधिकारी असल्याचे भासवले.अणि त्याच्या क्रेडिट कार्डावरून गैर व्यव्हार झाल्याचे सांगितले. आणि त्याच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी त्याच्या कडून 28 लाख रूपये मागितले आणि त्याची फसवणूक केली. सदर घटना 28 नवंबर रोजी चिंचवडच्या मोहननगर येथे घडली. 
ALSO READ: मुंबईत मुलीला 'डिजिटल अरेस्ट' करून 1.7 लाखांची फसवणूक
पीड़ित डॉक्टर ने सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आरोपी रविकुमार आणि एका अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

पोलिसांनी सांगितले की रविकुमार नावाच्या एका वयक्तीने डॉक्टरांना फोन केला आणि तो सीबीआई अधिकारी असल्याचे सांगितले आणि डॉक्टरांच्या क्रेडिट कार्डावरून एक कोटीचे ट्रांजेक्शन झाले आहे त्यांना सर्वोच्च न्यायालयाची आणि ईडीची खोटी नोटीस मोबाईलवर पाठवली.

या प्रकरणातून वाचण्यासाठी त्यांना किमान 20 लाख रूपये जमा करावे लागणार असे सांगण्यात आले. त्यानंतर इतर कारणे सांगून त्यांच्या कडून 28 लाख रूपये उकळले. त्याना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यानी सायबर पोलिसात तक्रार केली. पिंपरी पोलिस प्रकरणाचा तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती