महाराष्ट्रातील पुणे शहरातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. भारतीय रेल्वे लवकरच पुण्यातून चार नवीन वंदे भारत गाड्या सुरू करणार आहे, ज्यामुळे शहराची हाय-स्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होईल. या नवीन गाड्या प्रवाशांचा प्रवास जलद आणि आरामदायी तर बनवतीलच, शिवाय बराच वेळही वाचवतील.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून सुरू होणाऱ्या या चार वंदे भारत गाड्या शेगाव, वडोदरा, सिकंदराबाद आणि बेळगावसाठी चालवल्या जातील. धार्मिक, व्यावसायिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या या मार्गांवर हजारो प्रवाशांना वंदे भारत सेवेचा थेट लाभ मिळेल. रेल्वेने अद्याप या वंदे भारत गाड्या सुरू करण्याबाबत अधिकृतपणे माहिती दिलेली नसली तरी, लवकरच त्याची घोषणा होण्याची अपेक्षा आहे. तसेच पुणे-शेगाव वंदे भारत ट्रेन धार्मिक प्रवाशांसाठी विशेषतः फायदेशीर ठरेल. ही ट्रेन दौंड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना सारख्या स्थानकांवर थांबू शकते. अशी माहिती समोर आली आहे.