भारतात अनेक प्रकारचे प्राणी आढळतात. यामध्ये दुर्मिळ ब्लॅक पँथरचाही समावेश आहे. ब्लॅक पॅंथर किंवा मेलेनिस्टिक लेपर्ड हा भारतातील एक दुर्मिळ वन्य प्राणी आहे. त्यांना पाहण्याची संधी फक्त काही विशिष्ट ठिकाणीच उपलब्ध आहे. जंगलाभोवती राहणारे हे प्राणी फार कमी लोकांनी पाहिले आहे. भारतात ब्लॅक पँथर कुठे आढळतात? तसेच ब्लॅक पँथर पाहण्यासाठी ही सहा ठिकाणे सर्वोत्तम मानली जातात.
१. नागरहोल राष्ट्रीय उद्यानाजवळील काबिनी जंगल हे काळ्या पँथरसाठी प्रसिद्ध आहे.
२. कर्नाटकातील दांडेली अंजी व्याघ्र प्रकल्पाला आता 'काली व्याघ्र प्रकल्प' असे म्हणतात. पश्चिम घाटात, हे सदाहरित जंगल आहे. येथे ब्लॅक पँथर दिसतात.