Snake Village भारतातील असे एक गाव जिथे कोब्रा पाळले जातात

शुक्रवार, 9 मे 2025 (14:08 IST)
तुम्हाला भारतातील अशा गावाबद्दल माहिती आहे का जिथे लोक घरात कोब्रा साप पाळतात? जर नसेल तर तुम्हालाही या गावाबद्दल जाणून धक्का बसेल. सापाचे नाव ऐकून बहुतेक लोक घाबरतात, पण भारतात एक असे गाव आहे जिथे लोक साप पाळतात. हे विचित्र वाटेल, पण हे पूर्णपणे खरे आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. महाराष्ट्रातील या गावात मानव आणि साप एकत्र राहतात. म्हणूनच या गावाला 'सापांचे गाव' असेही म्हणतात. या गावाचे नाव शेटफळ गाव आहे.या गावातील प्रत्येक घरात कोब्रा पाळला जातो.
ALSO READ: Maharishi Panini: पाणिनी संस्कृत व्याकरणाचे शिल्पकार कसे बनले...जाणून घ्या
शेटफळ गावातील लोकांनी घरात कुत्रे आणि मांजरींऐवजी कोब्रा साप पाळले आहे. या गावात राहणारे लोक सापाला त्यांच्या कुटुंबाचा एक भाग मानतात. गावातील लोक सापांना अजिबात घाबरत नाहीत. खरंतर, सापाला भगवान शिवाचे प्रतीक मानले जाते, म्हणूनच गावातील लोक सापाला दूधही पाजतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या गावात राहणारी मुले कोणत्याही भीतीशिवाय सापांशी खेळतात.

तसेच शेटफळ गावातील लोक सापांची पूजा करतात. जर तुम्ही या गावात फिरायला गेलात तर तुम्हाला अशी अनेक मंदिरे दिसतील जिथे सापांची पूजा केली जाते. या गावात घरांव्यतिरिक्त, शेतात, झाडांमध्ये आणि लोकांच्या बेडरूममध्येही साप दिसतात. या गावात राहणारे लोक म्हणतात की त्यांना सापांची भीती वाटत नाही आणि साप त्यांना कोणत्याही प्रकारे इजा करण्याचा प्रयत्न करत नाहीत.
गावाचा इतिहास
ALSO READ: दररोज एक पुस्तक वाचल्याने काय होते? जाणून घ्या
या गावातील लोकांचा असा विश्वास आहे की त्यांच्या पूर्वजांनी साप पाळण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून येणाऱ्या पिढ्या ही परंपरा पुढे चालवत आहे. या गावात मुले लहानपणापासूनच सापांना हाताळायला शिकतात. जर तुम्हालाही अशा साहसी ठिकाणांना भेट देण्याची आवड असेल, तर तुम्ही एकदा तरी या गावात फिरण्याची योजना नक्कीच आखली पाहिजे.
ALSO READ: समाजसुधारक गोपाळ कृष्ण गोखलेंनी सांगितला कर्तव्याचा खरा अर्थ, जाणून घ्या
Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती