तुम्हाला माहिती आहे का की जगात असा एक देश आहे जिथे भीक मागण्यासाठी देखील सरकारकडून परवाना घ्यावा लागतो. चला जाणून घेऊया, कोणत्या देशात भीक मागण्यासाठी परवाना घ्यावा लागतो? जगभरात असे अनेक देश आहेत जिथे गरिबी शिगेला पोहोचली आहे. गरिबीमुळे लोकांना भीक मागावी लागते.
हा नियम २०१९ मध्ये लागू करण्यात आला. या नियमानुसार, येथे भीक मागणाऱ्या लोकांना वैध ओळखपत्र देखील दिले जाते. येथील लोकांना भीक मागण्याचा परवाना मिळविण्यासाठी २५० स्वीडिश क्रोना खर्च करावे लागतात. तसेच येथील स्थानिक नेत्यांचा असा विश्वास आहे की याद्वारे ते भीक मागण्याची प्रक्रिया कठीण करू शकतात आणि लोकांना भीक मागण्याच्या कामापासून दूर ठेवू शकतात.
एस्किलस्टुनातील स्थानिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की परवाना प्रक्रियेमुळे त्यांना त्यांच्या शहरात किती भिकारी आहे याचा अंदाज लावण्यास मदत होते. यामुळे गरीब भिकाऱ्यांना आवश्यक वस्तू पुरवणे देखील सोपे होते. तसेच त्यांना असाही विश्वास आहे की भीक मागण्याची प्रक्रिया कठीण करून, भिकाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. परवाना आणि शुल्क प्रक्रिया लागू झाल्यानंतर, अशा लोकांनी स्वतःची छोटी कामे करायला सुरुवात केली आहे.