शाळांना 15 टक्के फी सवलत द्या, शिक्षण विभागाचे आदेश

सोमवार, 2 मे 2022 (15:03 IST)
शाळांना 15 टक्के फी सवलत देण्याचे आदेश महाराष्ट्र शिक्षण विभागाने शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोरोना काळातील म्हणजेच वर्ष 2021 मध्ये शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या 15 टक्के फी सवलतीची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. आदेश देऊनही शाळांनी त्याचं पालन केलं नव्हतं. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला होता. यावरून आता पुन्हा पत्रक काढून 15 टक्के फी परत करा, नाहीतर पुढच्या वर्षात समाविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई शहर, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांचा समावेश असलेल्या मुंबईच्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना हा आदेश देण्यात आला आहे. 
 
दरम्यान, पुणे विद्यापीठातील विद्यार्थी फी वाढीवरुन आक्रमक झाले आहेत. तिप्पट फी वाढीमुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. ऑनलाईन परीक्षा, तिप्पट फी वाढीला विरोध आहे. तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटना आक्रमक झाली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती